[Mumbai] - भाजपच्या वाट्याला अधिक जागा?

  |   Mumbainews

मुंबई: महाराष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सत्तेबाहेरच ठेवावे लागेल, अशी आग्रही भूमिका घेत शिवसेनेचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाला २८८पैकी निम्म्या म्हणजे १४४ नव्हे, तर १५४ ते १५९ जागा देण्याचे मान्य करून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसोबतची युती शाबूत ठेवण्याचा निर्णय घेणार असल्याचे खात्रीलायक गोटातून समजते. दोन्ही पक्षांकडून मित्रपक्षांना प्रत्येकी नऊ जागा सोडल्या जाणार असून, भाजपला ज्या अधिकच्या जागा मिळतील त्यात या मित्रपक्षांसाठी सोडावयाच्या नऊ जागांचाही समावेश असेल. युतीबाबत येत्या दोन चार दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठक होणार असून बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब होईल, अशीही माहिती विश्वसनीय गोटातून मिळाली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊन आचारसंहिता लागू होणार असल्याने भाजप व शिवसेना यांच्यातील युतीच्या घडामोडींना वेग आला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत युती करताना आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप यांच्यात निम्म्या निम्म्या जागा वाटून घेण्याचे सूत्र ठरले होते. विशेष म्हणजे भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत जाहिररित्या याबाबतची घोषणाही करण्यात आली होती. मात्र त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला आणि भाजपची देशात एकहाती सत्ता आली. अलिकडेच केंद्र सरकारने काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याने भाजपचा जनाधार खूपच वाढल्याचा दावाही भाजपकडून केला जात आहे. त्याच आधारावर आधीचे १४४-१४४ जागांचे सूत्र बदलून नव्या सूत्रात भाजपला अधिक जागा मिळायला हव्यात, असा पवित्रा भाजपकडून घेतला जात आहे....

फोटो - http://v.duta.us/aaXWsQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/NtLtZgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬