[Mumbai] - मृत कामगारांच्या वारसांना पालिकेत नोकऱ्या

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

चार सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत गोरेगावमध्ये तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्याचे काम करत असताना जगदीश परमार (५४) आणि विजेंद्र बागडी (४०) या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका वारसाला महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले आहे. तसेच नियमानुसार कर्मचाऱ्यांची देणी देण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत.

मुंबईत मागील आठवड्यात झालेल्या धुवांधार पावसात मुंबईकरांच्या सुविधेसाठी पालिकेचे ३२ हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत होते. चार सप्टेंबर रोजी गोरेगाव परिसरात तुंबलेल्या पाण्याचा निचरा करताना जगदीश परमार यांचा मृत्यू झाला. तसेच पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगार विजेंद्र बागडी हे तोल जाऊन वाहत्या पाण्यात पडल्याने मृत पावले. या कामगारांच्या वारसांना पालिकेत नोकऱ्या देण्याची मागणी कामगार संघटना व गोरेगावच्या मोतीलाल नगर विकास समितीने केली होती....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/d5atkwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬