[Mumbai] - मुंबईत गुरुवारपर्यंत संततधार

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

सात दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी रविवारी पावसाने थोडी उघडीप दिली. शहरात सकाळी रिमझिम पाऊस पडला, तर उपनगरांमध्ये काही वेळ पावसाचा थोडा जोर होता. मात्र दुपारनंतर उपनगरांमध्येही पावसाचा जोर ओसरला. कुलाबा येथे सायं. ५.३० पर्यंत केवळ ५.६ मिमी. पावसाची नोंद झाली तर सांताक्रूझ येथे २१.३ मिमी. पाऊस दिवसभरात नोंदवला गेला. मात्र गुरुवारपर्यंत मुंबई आणि उर्वरित कोकण विभागात पाऊस कायम असेल, असे पूर्वानुमान हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आले आहे.

मुंबईत शनिवारी रात्री पावसाचा जोर कायम होता. सांताक्रूझ येथे शनिवारी सकाळी ८.३० ते रविवारी सकाळी ८.३० या वेळेत ११९ मिमी. पाऊस नोंदवला गेला. कुलाबा येथे ६६.४ मिमी. पाऊस नोंदवला गेला. सांताक्रूझ येथील पाऊस आतापर्यंतच्या सरासरीपेक्षा तब्बल १,२७४ मिलीमीटरहून अधिक पडला आहे. सांताक्रूझ येथे १ जूनपासून एकूण पाऊस ३,२६५ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. तर कुलाबा येथे २ हजार ३२५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कुलाब्याचा पाऊसही आत्तापर्यंतच्या सरासरीच्या ५१८ मिलीमीटरने अधिक आहे. या आठवड्यात पावसाने कुलाब्याची वार्षिक सरासरीही ओलांडली. कुलाब्यात वार्षिक सरासरी पाऊस २,१६० मिमी. पाऊस पडतो. आतापर्यंत २,३२५ मिमी. पाऊस कुलाब्यामध्ये नोंदवण्यात आला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/cAPaIwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬