[Mumbai] - मलाही दंडाची पावती फाडावी लागली: गडकरी

  |   Mumbainews

मुंबई: भरधाव वेगात गाडी चालविल्याप्रकरणी मला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनाही दंड भरावा लागला आहे, असं सांगतानाच नव्या वाहतूक नियमांमुळे पारदर्शकताच येईल. त्यामुळे भ्रष्टाचार होणार नसल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.

मोटार वाहन कायद्यात बदल करत दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यापार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी हा खुलासा करतानाच स्वत:लाही दंड भरावा लागल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे. मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते. वांद्रे-वरळी सी लिंकवर भरधाव वेगाने गाडी चालविल्यामुळे मलाही दंड भरावा लागला आहे. सुधारीत मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करणे हे आमच्या सरकारचे मोठे यश आहे. देशात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या रस्ते अपघातांसाठी रस्ता अभियंते आणि मोटार अभियंतेही जबाबदार आहेत, असं गडकरींनी सांगितलं. दरम्यान, रेल्वे मंत्र्यांनी भविष्यात दोन रेल्वे स्थानकांऐवजी ४०० स्थानकांवर ‘कुल्हड’मध्ये चहा देण्याची सुविधा सुरू होईल, असे आश्वासन दिले आहे....

फोटो - http://v.duta.us/OjGgmAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/mPYtpwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬