[Mumbai] - रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना ‘टच’चा आधार

  |   Mumbainews

समाजाचा भाग असूनही समाजापासून अव्हरले गेलेल्यांना मूळ प्रवाहात आणण्याचे कष्टप्रद काम 'टच' (टर्निंग अपॉर्च्युनिर्टीज फॉर अपलिफ्टमेंट अँड चाइल्ड हेल्प) सामाजिक संस्थेकडून सुरू आहे. उड्डाणपुलाखाली आयुष्य जगणाऱ्या मुलांप्रमाणेच अनाथ मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे प्रयत्न, वसतिगृह, महाविद्यालयातील गरीब मुलांसाठी ग्रंथालयपेढी आदी उपक्रमातून संस्थेचे कार्य विस्तारले आहे. आज या संस्थेच्या प्रयत्नातून शेकडो मुलामुलींना नवीन आयुष्य मिळाले असून त्यांच्या स्वप्नांना पंख फुटले आहेत. त्यातूनच आतापर्यंत अंधारमय आयुष्य जगत बसलेल्यांना नवीन आकांक्षांची भेट मिळाली आहे.

समाजातील अनाथांप्रमाणेच गरिबी वा प्राप्त परिस्थितीत शिक्षण घेणेही अवघड आलेल्या मुला-मुलींना आधार देण्यासाठी 'टच'तर्फे प्रयत्न केले जातात. त्यासाठी या अनाथ मुलांना शिक्षण उपलब्ध करण्यासाठी दत्तक पालक योजना अमलात आणली आहे. त्यात विविध भागांतील अनाथ मुलांना शिक्षणासाठी येणारा खर्च उचलण्याचे काम दत्तक पालक करतात. त्यातून आतापर्यंत सुमारे ३,५०० मुला-मुलींचे शिक्षणाचे अशक्यप्रय वाटणारे स्वप्न पूर्णत्वास आले आहे. शहरासह ग्रामीण भागातही दत्तक पालक आणि मुलांचे नाते जोडले आहे. त्यात वर्षातून शैक्षणिक शिबिरांतून शिक्षणासह व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. हे जाळे मराठवाडा, बेळगाव आसाम, पश्चिम बंगाल आदी विविध भागात पसरले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/gfvsuAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬