[Mumbai] - लालाबागच्या राजाला सोन्याचा मुलामा असलेली पावलं अर्पण

  |   Mumbainews

मुंबई: लालबागच्या राजाला एका गणेश भक्ताने सोन्याचा मुलामा असलेली चांदीची पावलं अर्पण केली आहेत. तर दुसऱ्या एका भक्ताने सोन्याची अंगठी दान केली आहे. त्यामुळे लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये या सोन्याचा मुलामा असलेल्या पावलांची जोरदार चर्चा होती.

गणेशोत्सव सुरू होऊन आठ दिवस उलटल्यानंतरही लालबागच्या राजा चरणी सोनं, चांदी अर्पण करण्यात येत आहे. अनेक भाविक निनावी दान देत आहेत. अशाच एका भक्ताने काल रविवारी लालबागच्या राजा चरणी सोन्याचा मुलामा असलेली ही चांदीची पावलं दान केली आहेत. दरम्यान, मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. काल आणि आज पावसाचा जोर ओसरल्याने अनेक भाविकांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्यामुळे लालबाग परिसरात मोठी गर्दी झाली आहे. राजकारणी, सेलिब्रिटींसह देश-विदेशातील पर्यटकही विघ्नहर्त्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी लालबाग परिसरात दाखल झाले आहेत.

फोटो - http://v.duta.us/ZqCIdAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Y1LUggAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬