[Mumbai] - सूचना पाठवा १० सप्टेंबरपर्यंत

  |   Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, मुंबई महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम व नियमांत बदल करण्याबाबतचे अभिप्राय, बदल, सूचना पाठवण्यासाठी १० सप्टेंबर ही अखेरची तारीख आहे. हे अभिप्राय जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात किंवा ग्रंथालय संचालनालायामध्ये पाठवायचे आहेत. अधिनियमांमध्ये बदलांसंदर्भात मुंबई विभागाची बैठक अलीकडेच झाली. ठाणे येथे झालेल्या बैठकीमध्ये ग्रंथालय पर्यटनाचा अनोखा पर्याय सुचवण्यात आला. ग्रंथालय करांसंदर्भातही या बैठकीमध्ये आग्रही भूमिका मांडली गेली. राज्य ग्रंथालय परिषदेच्या स्थापनेची गरजही या निमित्ताने व्यक्त झाली. सरकारने ग्रंथखरेदीचे निकषही निश्चित करावेत, स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्रंथालयासाठी जागा राखीव असावी, अशीही मागणी यानिमित्ताने करण्यात आली. ग्रंथालयामध्ये असलेल्या ग्रंथांचा दर्जा राखण्यासाठी सरकारने केंद्रीय पद्धतीने ग्रंथ खरेदी करून नॉर्वेमध्ये ज्याप्रमाणे ग्रंथपुरवठा केला जातो, तसा व्हावा अशीही सूचना करण्यात...

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/9m4MdQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬