[Nagpur] - डीएनडी तक्रारीसाठी अॅप कार्यान्वित

  |   Nagpurnews

म.टा. प्रतिनिधी,

सातत्याने येणारे अनावश्यक मोबाइल कॉल्स, कंपन्यांचे एसएमएसपासून सुटका मिळत नसेल तर मोबाइलधारकांना आता थेट दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे दाद मागता येणार आहे. यासाठी 'ट्राय'ने खास अॅप तयार केले असून ते आता कार्यान्वित झाले आहे.

'ट्राय डीएनडी' अशा नावाने हे अॅप असून ते गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले होते. आतापर्यंत प्रायोगिक तत्वावर सुरू असलेले हे अॅप ट्रायने सर्वसामान्य मोबाइलधारकांसाठी सुरू केले आहे. तुम्हाला एखाद्या कंपनीकडून व्हॉइल कॉल आल्यास किंवा एसएमएस आल्यास या अॅपमध्ये जाऊन संबंधित क्रमांक अॅपच्या माध्यमातून 'ट्राय'ला आणि तुमच्या मोबाइल सेवा प्रदाना कंपनीला 'रिपोर्ट' करावा लागेल. मोबाइल वापरकर्त्याने संबंधित कॉल किंवा एमएसएस बद्दल तक्रार दिल्यानंतर ग्राहकाला त्यासंदर्भात दोन आठवड्यात उत्तर देण्याचे बंधन मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांवर घालण्यात आले आहे. मात्र ही तक्रार नोंदविण्यापूर्वी संबंधित मोबाइलधारकाला आपला क्रमांक आधी 'डीएनडी' सेवेसाठी नोंदणीकृत करून घ्यावा लागेल. त्यानंतर संबंधित ग्राहकाला मोबाइल कंपनीला दोन आठवड्यांची मुदत द्यावी लागेल. दोन आठवड्यात संबंधित कंपनीला 'डीएनडी'ची मागणी करणाऱ्या ग्राहकाचा क्रमांक टेलिमार्केटिंग यादीतून काढावा लागेल. त्यानंतरही ग्राहाकाला टेलिमार्केटिंग कॉल किंवा एसएमएस आल्यास ट्रायकडून दंडाची तरतूद करण्यात येणार आहे....

फोटो - http://v.duta.us/JF9mmwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/5KNDJgAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬