[Nashik] - जवानावर अंत्यसंस्कार

  |   Nashiknews

म. टा. वृत्तसेवा,

‘शहीद मल्हार लहिरे अमर रहे’च्या घोषणा देत अत्यंत शोकाकुल वातावरणात नांदगाव तालुक्यातील कऱ्ही येथील जवान मल्हारी लहिरे यांच्यावर रविवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लाडक्या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी अवघे गाव जमा उपस्थित होते.

मल्हारी लहिरे यांचा शुक्रवारी गुजरात जामनगर येथे अंगावर वीज पडून मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव जामनगर येथून रविवारी सकाळी कऱ्ही गावात आणले. आपल्या गावातील जवानाचा मृत्यू झाल्याने सारे गाव हळहळले. सकाळी दहाच्या सुमारास

त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. लष्करातर्फे जवानाला मानवंदना देण्यात आली. सुभेदार जोगिंदर सिंग यांच्यासह अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. लष्करातर्फे मल्हारच्या आई, वडील, तसेच पत्नीचे सांत्वन करण्यात आले. महाराष्ट्र पोलिसांतर्फे बंदुकीच्या फैरी झाडून जवानाला मानवंदना देण्यात आली. यावेळी खासदार डॉ. भारती पवार, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार संजय पवार, जि. प. सभापती मनीषा पवार, रत्नाकर पवार, उपनगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्यासह विविध राजकीय पक्ष पदाधिकारी, प्रांत अधिकारी राजेंद्र पाटील, नांदगावचे तहसीलदार मनोज देशमुख, पंचायत समिती सभापती विद्या पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंग साळवे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे आदी उपस्थित होते...

फोटो - http://v.duta.us/uWKTqgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/MTfj2gAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬