[Thane] - तांत्रिक बिघाड; ठाणे- दिवा दरम्यानची रेल्वेसेवा ठप्प

  |   Thanenews

ठाणे: ठाणे-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे-दिवा दरम्यानची लोकल सेवा बंद झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना त्रासाला सामोरे जावं लागत आहे.

आज दुपारी सव्वा चारच्या दरम्यान ठाणे- दिवा स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे-दिवा अप आणि डाऊन रेल्वेसेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. दुपारची वेळ असल्याने लोकलला तुरळक गर्दी होती. मात्र रेल्वेसेवा ठप्प झाल्याने मुंबई आणि कर्जत-कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सकाळपासूनच ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेकांनी घराबाहेर पडणं टाळलं. मात्र, कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांना रेल्वेच्या खोळंब्यामुळे त्रासाला समोरे जावं लागत आहे. दरम्यान, लोकलसेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र हा बिघाड कधीपर्यंत दुरुस्त होईल याची माहिती रेल्वेने अद्याप दिलेली नाही.

फोटो - http://v.duta.us/ffiwaQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/0FFizAAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬