[ahmednagar] - आता आणखी तीन नावे चर्चेत

  |   Ahmednagarnews

नागवडे, गडाख व नरवडेंची नावे पुढे; राष्ट्रवादीचा 'उमेदवार शोध' अंतिम टप्प्यात

म. टा. प्रतिनिधी, नगर

नगर लोकसभा निवडणुकीचे ढोल अजून अधिकृतपणे वाजू लागले नसले तरी अंतिम निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीची राजकीय पूर्वतयारी मात्र सर्वच पक्षांची जोरात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपली उमेदवार शोधमोहीम अंतिम टप्प्यात आणल्याचे सांगितले जाते. या पक्षाकडून नव्याने अनुराधा नागवडे, प्रशांत गडाख व मनोज नरवडे अशी तीन नावे चर्चेत आली आहेत. आधीच पाच जणांची नावे या पक्षाने चर्चेत ठेवली आहेत. त्यात आता आणखी तिघांची भर पडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतिम रिंगणातील उमेदवार कोण, याची उत्सुकता दिवसेंदिवस ताणली जाऊ लागली आहे.

लोकसभेची नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची केली आहे. या जागेवर डॉ. सुजय विखे यांनी दावा केला असला तरी त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दिला आहे. या जागेवर कोणाला उभे करायचे याचा अंतिम निर्णय येत्या दोन-तीन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून अपेक्षित मानला जात आहे. दुसरीकडे डॉ. विखे यांनी कोणत्याही परिस्थितीत यंदाच्या निवडणुकीत उतरायचेच, असा निश्चय केला असून, राष्ट्रवादीने त्यांच्यासाठी ही जागा सोडली नाही तर त्यांची उमेदवारी दोन्ही काँग्रेस आघाडीच्यादृष्टीने बंडखोरी ठरणार आहे. त्यामुळेच आता राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकतेचे झाले आहे....

फोटो - http://v.duta.us/Sy5ySAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/h9_30gEA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬