[ahmednagar] - काष्टीत कुटुंबाला लुटले

  |   Ahmednagarnews

पाच जणांच्या टोळक्याने सोने, रोकडसा गाडी पळविली

म. टा. वृत्तसेवा, श्रीगोंदा

श्रीगोंदा तालुक्यातील नगर-दौंड महामार्गावर काष्टी येथे रविवारी रात्री भररस्त्यात एका कुटुबांला लुटल्याची घटना घडली. चोरट्यांनी त्यांच्याकडील वीस हजारांची रोकड, सोने, चारचाकी गाडी, मोबाइल असा ऐवज घेऊन पोबारा केला.

सदर घटनेचा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सतिश गावित करीत आहे.

सविस्तर माहिती अशी, 'दौड (जि. पुणे) येथील रहिवासी दत्तात्रय बंडू ननवरे (वय ४८) हे पत्नी लता (वय ४२) व मुलगा जय (वय १७) हे रविवारी (१० फेब्रुवारी) रात्री श्रीगोंदा येथील नातेवाइकांना भेटून मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान आपल्या ईको मारुती (एम. एच. १२ के. एम. १९१४) या गाडीने श्रीगोंद्याहून घरी दौडला निघाले होते. काष्टी येथे नगर-दौड रोडवर मातोश्री हॉस्पीटलजवळ आल्यानंतर दत्तात्रय ननवरे हे गाडी थांबवून लघुशंकेला उतरले. त्यानंतर गाडीत बसत असताना समोरुन पाच अज्ञात लोक पळत गाडीजवळ आले. सर्वांनी तोंडाला रूमाल बांधले होते. त्यातील तिघांनी दत्तात्रय ननवरे याना पकडून त्याच्या गळ्याला दोन्ही बाजुने चाकू लावून गाडीची चावी मागितली. नंतर पत्नीच्या गळ्यातील, कानातील, पायातील, दागिन्यांसह सर्वांजवळील तीन मोबाइल व खिशातील वीस हजार रुपये रोकड काढून घेतली. सर्वांना खाली उतरवून, 'गाडीचा पाठलाग केला, तर कापून टाक', अशी धमकी देऊन गाडीत बसून दौंडच्या दिशेने पळून गेले. त्यानंतर ननवरे कुटूंब शेजारीला मातोश्री हॉस्पीटलमध्ये गेले. त्यांनी सर्व हकिकत डॉ. नवनाथ लाड यांना सांगितली. त्यानंतर दहा मिनिटात पोलिस घटनास्थळी पोहोचले....

फोटो - http://v.duta.us/npOBgAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/UbzaOQAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬