[ahmednagar] - नगरला कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा विचार

  |   Ahmednagarnews

नगर : कचऱ्यातून खतनिर्मितीचा यशस्वी प्रकल्प राबवणाऱ्या नगर महापालिकेने आता कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा विचार सुरू केला आहे. भाजपचे नवे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी यासाठी नाशिक महापालिकेची मदत घ्यायचे ठरवले आहे. नाशिक महापालिकेने अंबडला उभारलेला असा प्रकल्प तसेच मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये तेथील महापालिकेचा असा प्रकल्प पाहून नगरला तो राबवण्याचे त्यांचे नियोजन आहे व त्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांचे व पदाधिकाऱ्यांचे विशेष पथक तेथे अभ्यासासाठी नेण्याचे त्यांनी ठरवले आहे.

नाशिक येथे सोमवारी भाजपच्या शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक झाली. त्यासाठी महापौर वाकळे नाशिकला गेले होते. तेथे त्यांची भेट नाशिकच्या महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते व प्रकल्प अधिकारी बाजीराव माळी यांच्याशी झाली. नाशिक महापालिकेने अंबड येथे राबवलेल्या घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाची माहिती वाकळेंनी त्यांच्याकडून घेतली. नगर शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर असल्याने अशा प्रकारचा प्रकल्प नगर शहरात उभारता येईल का, याबाबत त्यांच्याशी सविस्‍तर चर्चाही केली. या वेळी भाजप युवा मोर्चाचे तुषार पोटे व पुष्कर कुलकर्णी उपस्थित होते. त्यानंतर नगर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी व घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन नाशिक महापालिकेचा अंबड प्रकल्प पाहण्यास येण्याचे त्यांनी स्पष्ट केल्यावर नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे स्वागत केले व नगरचा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाहीही दिली. दरम्यान, अंबड प्रकल्पासह इंदोर महापालिकेनेही राबवलेल्या अशा प्रकल्पाच्या पाहणीसाठी मनपा अधिकारी, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा विशेष दौरा करण्याचे महापौर वाकळेंनी जाहीर केले असून, त्याचे नियोजनही सुरू केले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/G5u6vwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬