[ahmednagar] - महिलेचे चित्रीकरण करून धमकावलेम. टा. वृत्तसेवा पाथर्डी दि. ११ फेब्रुवारी शौचालयासाठी शेतात गेलेल्या महीलेच

  |   Ahmednagarnews

पाथर्डी : शौचालयासाठी शेतात गेलेल्या महिलेचे मोबाइलमधे चित्रीकरण करुन विनयभंग केल्याची घटना रविवारी शहरालगच्या एका गावात घडली. चित्रीकरण इतरांना दाखविण्याची धमकी देणाऱ्या युवकाविरुद्ध महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

शहरालगतच्या गावात एक महिला आपल्या मुलीसोबत राहते. महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. सदर महिला तीन फेब्रुवारी रोजी सकाळी स्वतःहाच्या शेतात शौचास गेली होती. तेथे तिला दहा फूट अतंरावर एक मोबाइल व त्याचा कॅमेरा सुरू असल्याचे दिसले. महिलेने मोबाइल घेतला, तेंव्हा कॅमेरा सुरू होता व चित्रीकरणही सुरू होते. महिलेने मोबाइल घरी आणला. त्यानंतर थोड्याच वेळात ज्याचा मोबाइल होता, तो युवक महिलेच्या घरी आला व मोबाइल मागू लागला. मोबाइल देण्यास महिलेने नकार दिल्यानंतर 'तुझे आणखी व्हिडिओ माझ्याकडे आहेत. ते सगळ्यांना दाखविल,' अशी धमकी त्या युवकाने दिली. त्यानंतर महिलेने ९ फेब्रुवारी रोजी तिच्या पुतण्याला घटना सांगितली. त्याने युवकाची भेट घेतली असता त्याने त्यालाही शिवीगाळ करुन धमकी दिली. अखेर सोमवारी महिलेने पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. पोलिसांनी विनयभंग व धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा नोंदविला असून सहाय्यक फौजदार अरविंद चव्हाण तपास करीत आहेत. संशयीत आरोपी फरारी झाला आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/xjs35wAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬