[ahmednagar] - सध्या पुरस्कारांचे पीक जोरात

  |   Ahmednagarnews

बी.जे. खताळ-पाटील; अनंत फंदी पुरस्कारांचे वितरण

म. टा. वृत्तसेवा, संगमनेर

'सध्या सगळीकडे पुरस्कार देणारे आणि घेणाऱ्यांचे पीक आले आहे. मात्र, पुरस्कारांच्या या भाऊगर्दीत कवी अनंत फंदी यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार निखळ साहित्यिक मूल्य या निकषावरच दिला जात असल्याने आपले वेगळेपण टिकवून आहे,' असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक, माजीमंत्री बी. जे. खताळ यांनी केले.

संगमनेर इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे, मंडळाचे अध्यक्ष डी. बी. राठी व पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते. मागील तेरा वर्षांपासून लोकसहभागातून हे पुरस्कार दिले जातात. यापूर्वी स्वतः लेखक, कवी यांनी पाठविलेल्या साहित्यकृतीतून पुस्तके निवडून पुरस्कार दिला जायचा. मात्र, मागील तीन वर्षांपासून त्या, त्या वर्षात विविध क्षेत्रातील जाणकारांनी वाचलेल्या व सुचविलेल्या पुस्तकांचा विचार करून हा पुरस्कार दिला जातो. डोंबिवली येथील डॉ. मृदुला दाढे-जोशी यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतील काही निवडक नामवंत संगीतकारांच्या गाण्यांचे रसग्रहण असलेल्या 'रहे ना रहे हम', साक्री येथील कवी रावसाहेब कुवर यांच्या शेतकऱ्यांच्या दोन पिढीतील संवाद हरवल्याने होणाऱ्या वाताहतीचे दाहक वास्तव मांडणाऱ्या 'हरवल्या आवाजाची फिर्याद' या कवितासंग्रहाला व संगमनेर येथील लेखिका नीलिमा क्षत्रिय यांच्या 'दिवस आलापाल्ली'चे या पुस्तकांना या वर्षीचा कवी अनंत फंदी पुरस्कार प्रदान करण्यात आला. गावोगाव आणि घरोघरी जाऊन मराठीतील उत्तमोत्तम साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणारे राहाता येथील ग्रंथविक्रेते डी. यु. जोशी यांचा ग्रंथदूत पुरस्काराने तर संगमनेर शहरातील संगीत, कला, शिक्षण, अर्थकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या डॉ. अरविंद रसाळ यांचा कृतज्ञता गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सात्रळ येथे वाचन चळवळ चालवणाऱ्या किरण कडू यांच्या उपक्रमासाठी मंडळाच्या वतीने १०० पुस्तके भेट देण्यात आली. डॉ. प्रसाद रसाळ, दिनकर साळवे, किरण झंवर यांनी यावर्षीच्या पुरस्कारप्राप्त साहित्यकृतींची निवड केली होती....

फोटो - http://v.duta.us/TE_qBgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/hJ_IMQAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬