[aurangabad-maharashtra] - केंद्र प्रमुखांवर गुन्हा नको

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावी, बारावी परीक्षेबाबात मंडळाच्या विविध सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावा, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत. मुख्याध्यापकांच्या बैठकीत परीक्षेचा मुद्दा समोर होता. मात्र, सूचना अन् मागण्यांचाच भडीमार होता. उत्तरपत्रिका तपासणीचे काम मुख्याध्यापकांना देऊ नका, केंद्र प्रमुखांवर गुन्हे दाखल करू नका, अशा प्रकारची मागणी मुख्याध्यापकांनी रेटून धरली.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा काही दिवसावर आल्या आहेत. बारावीची लेखी परीखा २१ फेब्रुवारी तर दहावीची एक मार्चपासून सुरू होत आहे. त्या अनुषंगाने परीक्षेच्या तयारीबाबत मुख्याध्यापकांची बैठक घेत शिक्षणाधिकारी, मंडळ अधिकारी यांनी परीक्षेतील माहिती देत, बाकडे, सुविधा पुरविण्याबाबत स्पष्ट केले. शहरीभागासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पेपर लिहिताना काय काळजी घ्यावी, याच्या सूचना परीक्षा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना देणे अपेक्षित आहे, परंतु मुलांना सूचना न दिल्यामुळे बऱ्याच वेळा पेपरमध्ये गाणी लिहिणे, भावनिक मजकूर लिहिणे असे प्रकार समोर येतात. परिणामी आक्षेपार्ह लेखन केल्याने कार्यवाहीस सामोरे जावे लागून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होते. हे लक्षात घेत विद्यार्थ्यांना सूचना, नियमावली सांगण्यात यावी अशी सूचना करण्यात आली. तर याच बैठकीत उत्तरपत्रिका तपासणीचे काम मुख्याध्यापकांना देणे योग्य नाही. कारण ते केंद्र प्रमुख म्हणूनही काम करतात. त्यांच्या मानधनात वाढ करावी, केंद्र प्रमुखांवर गुन्हे दाखल करू नये, अशी मागणी मुख्याध्यापकांनी जोर देऊन केली. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी अन् मुख्याध्यापक असा वाद रंगला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/IQrfoAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬