[aurangabad-maharashtra] - गळा आवळून मारण्याचा प्रयत्न; आरोपीला सक्तमजुरी

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

माझ्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार का केली ?, अशी विचारणा करत मारहाण करून नायलॉनच्या दोरीने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी सोमनाथ त्रिंबक लासुरे याला सात महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. साळुंके यांनी ठोठाविली.

या प्रकरणात भीमा शामराव चाबुकस्वार (वय २७, रा. गावतांडा ता. पैठण) यांनी तक्रार दिली होती. १०जुलै २०१८ रोजी चाबुकस्वार व त्यांचे मित्र राजू शेषराव मावस, शिवाजी जगन्नाथ नरवडे, असे तिघे दुचाकीवरून गावतांडा गावात गेले होते. सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेजवळील समाज मंदिरासमोर चाबुकस्वार त्यांचे मित्र उभे असताना तेथे आरोपी सोमनाथ त्रिंबक लासुरे (वय २५, रा. बालानगर ता. पैठण) हा आला. त्याने राजू मावस याला शिवीगाळ करून माझ्या विरोधात पोलिसात तक्रार का दिली, असे म्हणत चाबुकस्वार यांना तू देखील माझ्या विरोधात तक्रार दिली?, तू राजूला मदत करून माझ्या विरोधात जातो का? तुला गावात यायचे नाही का? असे म्हणून आरोपी लासुरे याने चाबुकस्वार यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपीने पॅन्टच्या खिशातून नायलॉनची दोरी काढून चाबुकस्वार यांचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. चाबुकस्वार यांनी प्रतिकार केल्याने त्यांच्या गळ्याला दोरीचे व्रण उमटले. दरम्यान चाबुकस्वार यांच्या मित्रांनी आरडा-ओरड केल्याने गावातील लोक जमा झाले. गर्दी पाहून आरोपीने तेथून काढता पाय घेतला. या प्रकरणात एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध कलम ३०७, ३२३ व ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/pQIx2QAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬