[aurangabad-maharashtra] - चला मराठीत पत्र लिहुया

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठी भाषेची गोडी वाढावी अन् तिची समृद्धी चिरकाल टिकावी यासाठी मराठी दिनाच्या निमित्ताने शहरात उर्दू शाळांमधील मुले मराठीतून पत्र लिहित आहेत. 'मराठी पत्र लेखन' स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी चक्क शहरातील कचऱ्याचा प्रश्न हाती घेतला. थेट महापौर, विभागीय आयुक्तांना पत्र लिहित शहरात, शाळा परिसरात स्वच्छता ठेवा, आभारी राहील, असे लिहून शालेय विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घातले आहे.

मोबाइल, सोशल मीडियाच्या वापरामुळे पत्र लिहिणे बंद झाले आहे. हे लक्षात घेत मराठी दिनाच्या निमित्ताने 'रिड ॲण्ड लिड फाऊंडेशन'तर्फे उर्दू शाळांतील विध्यार्थ्यांसाठी पोस्ट कार्डवर मराठी भाषेत पत्र लेखन स्पर्धा घेण्यात येत आहे. सोमवारपासून स्पर्धेची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना पोस्ट कार्डचे वाटप मोईनुल ऊलुम हायस्कूलमध्ये करण्यात आले होते. त्यासह अन्य शाळा मिळून तीन हजार विद्यार्थ्यांना पोस्ट कार्डचे वाटप करण्यात आले होते. उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषेतून २५ हजार विद्यार्थ्यांकडून पोस्ट कार्डवर पत्र लेखन करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी पाच विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. त्यात 'सुंदर माझे शहर', 'महाराष्ट्र माझा', 'नवीन वर्षात असे हवे शहर माझे, राज्य माझे', 'मी आणि माझे शहर', 'स्वच्छ व सुंदर माझे शहर-राज्य' असे विषय आहेत. इकरा गर्ल्स हायस्कूल, रशिदा उर्दू हायस्कूल, तर मंगळवारी महानगर पालिका शाळा नारेगाव, मौलाना आजाद हायस्कूल, अलमीर उर्दू हायस्कूल रोशन गेट, इकरा बॉईज हायस्कूलमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन 'रिड ॲण्ड लिड फाऊंडेशन' अध्यक्ष मिर्जा अब्दुल कय्युम नदवी यांनी केले आहे....

फोटो - http://v.duta.us/ZWDHDQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/C8R5HQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬