[aurangabad-maharashtra] - मुथ्थूट फायनान्सची फसवणूक, एकाला अटक, कोठडी

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा.प्रतिनिधी ,औरंगाबाद

मुथ्थूट होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला बनावट कागदपत्रांआधारे ३० लाखांचा गंडा घातल्याप्रकरणात पोलिसांनी सोमवारी एका संशयित आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता १३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी ए. व्ही. खारकर यांनी दिले. इम्रान आरेफ खान (वय २८, रा. कैसर कॉलनी) असे त्याचे नाव आहे.

मुथ्थूट होम फिन (इंडिया) लि.चे क्लस्टर सेल्स मॅनेजर विजयकुमार तात्याराव चव्हाण यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मुथ्थूट होम फिन कंपनी संशयित आरोपी इम्रान आरेफ खान व त्याची पत्नी रेश्मा इम्रान खान (रा. खासगेट) यांनी गृहकर्जासाठी अर्ज दिला होता. त्यांनी त्यासाठी शांतीलाल चौधरी व सुदर्शन कालिके यांच्याकडून जयसिंगपुरा येथील मालमत्ता खरेदी करीत असल्याची कच्ची इसारपावती केली होती. त्याआधारे कंपनीने २८ लाख ६३ हजार ३१० रुपयांचे कर्जावर ३० हजार ५३६ रुपयांचा हप्ता ठरवून दिला होता. आरोपींनी सात हप्ते भरल्यानंतर ते भरणे बंद केले. त्यामुळे हे कर्ज खाते अनुत्पादक म्हणून घोषीत झाले. आरोपींनी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता आरोपी नोकरीला असलेली कंपनी अस्तित्वात नसल्याचे समोर आले. तसेच कर्ज घेण्यासाठीची मुथ्थुट होम फायनान्स कंपनीचे रिलेशिनशिप ऑफिसर विजयकुमार शंकरराव राठोड यांच्याशी संगनमत करून बनावट कागदपत्रांआधारे २८ लाख ६३ हजार ३१० रुपयांचे कर्ज घेवून कंपनीची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/KXeEEQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬