[aurangabad-maharashtra] - विद्यार्थ्यांना २० किमी दूरचे परीक्षा केंद्र

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बालानगर येथील उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना २० किलोमीटर दूर असलेल्या पैठणमधील परीक्षा केंद्रावरून परीक्षा देण्याची वेळ आली आहे. भोकरदनमधील अशीच तक्रार घेऊन पालक मंडळात दाखल झाले. काही दिवसांवर परीक्षा आली असताना परीक्षा केंद्र बदलून देण्याबाबतचे अनेक पत्र मंडळाला आले. त्यामुळे मंडळाने दिलेल्या परीक्षा केंद्राबाबतचा गोंधळ समोर आला. दुसरीकडे मंडळाने मात्र आता परीक्षा केंद्रात बदल शक्य नाही, असे म्हणत कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे प्रशासनाचा प्रताप विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरतो की काय अशी भीती व्यक्त होत आहे. तर, संस्थाचालकही पालकांना पुढे करत असल्याचे सांगण्यात येते.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा एक मार्चपासून तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. बारावी, दहावीचे परीक्षा केंद्र देताना विद्यार्थ्यांना दूरचे केंद्र देण्यात आल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. सोमवारी अशा अनेक तक्रारी घेऊन मुख्याध्यापक, प्राचार्य, पालकही मंडळात दाखल झाले. विभागीय मंडळाने परीक्षा केंद्र देताना संस्थेतील क्षमता, पायाभूत सुविधा, वीज, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा बाबींवर लक्ष देणे आवश्यक असते. त्यासह विद्यार्थ्यांना दूरचे परीक्षा केंद्र देऊ नये, असे संकेत आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. असे असले तरी केंद्र देताना जवळचे केंद्र सोडून दूरचे परीक्षा केंद्र देण्याचे प्रकार समोर आले. औरंगाबाद-पैठण रोडवरील बालानगर केंद्राबाबतही असाच गोंधळ झाला आहे. येथील विद्यार्थ्यांना थेट पैठणमधील केंद्रावरून परीक्षा द्यावी लागणार आहे. असाच प्रकार भोकरदनमध्ये झाल्याची तक्रार घेऊन पालक आले होते. आठ, दहा, १५, २० किलोमीटरचा प्रवास करून परीक्षा केंद्रावर पोहचल्यानंतर परीक्षार्थींची मनस्थिती, त्यांचा वेळ याचा विचार होत नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे होते. त्यासह ग्रामीण भागातील वाहतुकीच्या सोयीसुविधा लक्षात घेता परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे मंडळाने अनेक चुकीचे परीक्षा केंद्र दिल्याची तक्रार होते आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/UedGJgAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬