[dhule] - पवारांच्या नावाशिवाय झोप नाही

  |   Dhulenews

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना पवारांचे नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. त्यांना ‘मेनिया’ आजार झाला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी महाजन यांच्यावर टीका केली. आधी जळगाव जिल्ह्याचा विकास करावा मगच बारामतीचा विचार करावा, असा टोलाही सोमवारी (दि. ११) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत त्यांनी लगावला.

भाजपचे सोमवारी (दि. ११) शक्तिकेंद्र प्रमुखांचे संमेलन जळगावात पार पडले. या संमेलनात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी विरोधकांवर टीका केली. या टीकेला उत्तर देण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून पत्रकार परिषत घेण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, कल्पना पाटील, मंगला पाटील, अभिषेक पाटील, लीना चौधरी, ललित बागूल, अरविंद मानकरी, सलीम इनामदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते....

फोटो - http://v.duta.us/k7HhRQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/PrqP-gAA

📲 Get Dhule News on Whatsapp 💬