[dhule] - वऱ्हाडींच्या मदतीला धावली एसटी!

  |   Dhulenews

म. टा. वृत्तसेवा, धुळे

तालुक्यातील वणी-मळाणे येथील सोनवणे कुटुंबातील मुलाचा विवाहसोहळा रविवारी (दि. १०) साक्री शहरात आयोजित करण्यात आला होता. यासाठी विवाहस्थळी जाण्यासाठी शहरातील एका ट्रॅव्हल्सकडून तीन खासगी बसेस बुकिंग आगाऊ रक्कम भरून दोन महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती. मात्र, विवाहाच्या दिवशी सकाळी आठवाजेपर्यंत बस वऱ्हाडीमंडळींना घेण्यासाठी न आल्याने ट्रॅव्हल्स कार्यालयाला विचारणा केली असता तीनही बस नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. यामुळे नवरदेवाच्या नातेवाइकांनी राज्य परिवहन महामंडळातील धुळे आगारप्रमुख भगवान जगनोर यांना ही माहिती दिली. त्यांनी तत्काळ विवाहस्थळी जाण्यासाठी दोन एसटी बस उपलब्ध करून दिल्याने वऱ्हाडींच्या मदतीला बस धावून आल्याचा प्रत्यय रविवारी आला.

धुळे तालुक्यातील वणी-मळाणे येथील संदीप सोनवणे यांचा साक्री शहरात रविवारी (दि. १०) विवाह होता. यासाठी त्यांचे बंधू सिद्धार्थ सोनवणे यांनी दि. २८ डिसेंबर २०१८ रोजी धुळ्यातील एका टूर ॲण्ड ट्रॅव्हल्सकडून तीन खासगी बसेसची बुकिंग केली होती. ठरल्याप्रमाणे ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापकाने ३३ हजार रुपयांत तीन बस उपलब्ध करून देण्याचे कबूल केले होते. त्यासाठी आगाऊ दहा हजारही देण्यात आले. मात्र, ऐन विवाहाच्या दिवशी सकाळी आठ वाजता वऱ्हाड घेण्यासाठी वणी-मळाणे गावात या बस आल्याच नाहीत. यामुळे सकाळी ९ वाजेपर्यंत वऱ्हाडीमंडळींची दमछाक झाली....

फोटो - http://v.duta.us/9-vs7wAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/eCVqSwAA

📲 Get Dhule News on Whatsapp 💬