[jalgaon] - कन्नड घाटात पाच लाखांची लूट

  |   Jalgaonnews

कन्नड घाटात पाच लाखांची लूट

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

महामार्ग क्र. २११ वरील कन्नड घाटात अज्ञात चोरट्यांनी रविवारी (दि. १०) रात्री ९ वाजता कार आडवी लावून सिगारेट एजन्सीच्या व्यवस्थापकाला लुटले. चोरट्यांनी त्याला मारहाण करीत त्यांच्याकडील पाच लाखांची रोकड व मोबाइल फोन जबरीने चोरून नेले.

शहरातील पवारवाडी, शांतीनगर भागातील रहीवासी असलेल कैलास वासुदेव गुंडीयाल हे सुरेश रावलानी यांच्या नॅशनल टोबॅको एजन्सीत व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. रविवारी ते पेमेंट वसुलीसाठी खामगाव व औरंगाबाद येथे कारने गेले होते. चालक संजय भिडे त्यांच्यासोबत होता. औरंगाबाद येथील काम आटोपून कन्नड येथील एका पार्टीकडून रात्री ८ च्या सुमारास त्यांनी ४ लाख ९० हजाराचे पेमेंट घेतले. कारने येत असताना कन्नड घाटातील दर्ग्याजवळ पोहचले असता अचानक एक कार त्याच्या कारला आडवी झाली. गुंडीयाल यांची कार थांबवून आडव्या झालेल्या कारमधून दोघांनी शिवीगाळ करत गुंडीयाल व त्याच्या चालकाला मारहाण सुरू केली. यानंतर त्यांनी रोकड, मोबाइल घेत पोबारा केला. या वेळी तेथे गस्तीवरील पोलिसांनी लागलीच त्यांचा पाठलाग केला. परंतु ते सापडले नाहीत. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुंडीयाल यांना मारहाण करणारे दोघंही मराठीत बोलत होते.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/C-Jd7AAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬