[jalgaon] - जिल्ह्याच्या प्रलंबित कामांना गती

  |   Jalgaonnews

मुंबईत आमदार खडसेंच्या उपस्थितीत बैठक

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी विविध शैक्षणिक, संशोधन संस्था, महाविद्यालय, विकासकामे मंजूर करण्यात आली होती. याबाबत सोमवारी (दि. ११) मुंबईत मंत्रालयात बैठक झाली. या वेळी जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठीच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

मुंबईत सोमवार झालेल्या या बैठकीत माजी महसूल मंत्री आमदार एकनाथ खडसे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव एकनाथ डवले, आमदार संजय सावकारे आदींसह संबंधित विभागाचे सचिव व अधिकारी उपस्थित होते. या वेळी बैठकीत जिल्ह्यातील जलसंपदा व जलसंधारण विभागाची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी चर्चा करण्यात आली. यासोबत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी चे विभाजन करुन उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतुद करणे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत जिल्ह्यामध्ये शासकीय दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करणे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत भुसावळात शासकीय मत्स्य महाविद्यालय सुरू करण्यासाठी आर्थिक तरतुद करणे यांसारख्या विषयांवर चर्चा झाली. वरणगावमधील पोलिस प्रशिक्षण केंद्रासाठी अर्थसंकल्पात निधी मंजूर करणे, यावल तालुक्यातील हिंगोणा येथे महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठअंतर्गत केळीचे टिश्यूकल्चर रोपे तयार करण्याच्या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पीय तरतुद करणे यांसह संत मुक्ताई मंदिर या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यातील कामे सांर्वजनिक बांधकाम मंडळामार्फत करण्यासह विविध प्रलंबित विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

फोटो - http://v.duta.us/ewxIXwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/kXCecQAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬