[jalgaon] - जिल्ह्याच्या भूजल पातळीत चार मीटरने खालावली

  |   Jalgaonnews

भूजल सर्वेक्षणात माहिती उघड; दुष्काळाचे सावट

म. टा.प्रतिनिधी,जळगाव

यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने जळगाव जिल्ह्याच्या भूजल पातळीत मोठी घट आल्याचे जानेवारी महिन्यात करण्यात आलेल्या भूजल सर्वेक्षणात समोर आले आहे. विशेष म्हणजे केळी लागवड होणाऱ्या तालुक्यांमध्येही साडेतीन ते चार मीटरने भूजल पातळी घटल्याने यंदा भीषण दुष्काळाचे सावट जळगाव जिल्ह्यावर पसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दरवर्षी जानेवारी, मार्च, मे आणि ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात भूजल पातळीचे सर्वेक्षण केले जाते. जळगाव जिल्ह्यात ६६ पाणलोट क्षेत्रात असलेल्या १७८ विहिरींच्या जलपातळीची नोंद या सर्वेक्षणात घेतली जाते. यावर्षी जानेवारी २०१९ महिन्यात केलेल्या भूजल सर्वेक्षणात जिल्ह्यातील ७ ते ८ तालुक्यांमध्ये भूजल पातळी तब्बल ४ मीटरपर्यंत खालावली असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Yn_FkAAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬