[kolhapur] - कोल्हापूरः शिवशाहीच्या तिकीट दरात कपात

  |   Kolhapurnews

मुंबई, नाशिक, नांदेड, जालन्यापर्यंत शिवशाही बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. एसटी महामंडळाने शिवशाहीच्या तिकीट दरात कपात केली आहे. बारा फेब्रुवारीपासून नवीन तिकीट दराचा लाभ घेता येईल. कोल्हापूर ते मुंबईसाठी आता ७८५ रुपये इतका तिकीट दर आहे. विविध मार्गावरील शिवशाहीच्या बसतिकीटात २३० ते ५०५ रुपयांची कपात झाली आहे.

कोल्हापूर ते मुंबई, बोरीवली, नाशिक, नांदेड आणि जालना बससेवेसाठी नवीन तिकीट दर जाहीर केले आहेत. महामंडळाने शिवशाही बससेवेच्या (शयनयान) तिकीट दरात कपात करण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणकडे पाठवला होता. प्राधिकरणने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार महामंडळाने १२ फेब्रुवारी व १३ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून नवीन दर अंमलात येईल असे म्हटले आहे. शिवशाहीच्या कमी झालेल्या तिकीटदरामुळे खासगी प्रवासी वाहतुकीशी सक्षमपणे स्पर्धा करत जास्तीत जास्त प्रवासी वाढविण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे. वातानुकूलित बससेवेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तीस टक्के सवलत दिली आहे. तिकीट दरातील कपातीचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे....

फोटो - http://v.duta.us/H-Uh3gAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/TDIaMgAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬