[kolhapur] - बाळेघोल शाळेला ग्रामस्थांनी लावले कुलूप

  |   Kolhapurnews

म. टा. वृत्तसेवा, कागल

शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी करूनही बाळेघोल (ता. कागल) येथील प्राथमिक शाळेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी प्रशासनाचा निषेध करून ग्रामस्थांनी सोमवारी शाळेला कुलूप ठोकले. त्यामुळे दिवसभर शिक्षक बाहेर आणि मुले घरी अशी स्थिती राहिली. सरपंचांसह संतप्त ग्रामस्थांनी सकाळी आंदोलन केले.

बाळेघोलची ही शतकमहोत्सवी आणि परिसरात गुणवंत विद्यार्थी घडविणारी आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सुरुवातीला पाच, नंतर चार, तीन असे शिक्षक कमी होत आता दोनच शिक्षक उरले आहेत. पंधरा दिवसांपासून सांगलेवाडी येथील एक कामगारी व मूळचे दोन असे तीन शिक्षक कार्यरत आहेत. इयत्ता पहिली ते सातवी असे सात वर्ग असून ७९ पटसंख्या आहे. त्यानुसार येथे सात शिक्षक हवेत अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. ती पूर्ण होत नाही म्हणून त्यांनी आज शाळेला कुलपे घातली. याबाबत पंचायत समितीच्यावतीने गटशिक्षणाधिकारी जी. बी. कमळकर, आर. एस. पाटील यांनी भेट देऊन ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला....

फोटो - http://v.duta.us/IJ4EoQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/uysK4wAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬