[maharashtra] - नाशिकमध्ये छगन भुजबळांकडून रंगला 'ठाकरे'चा खेळ

  |   Maharashtranews

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात छगन भुजबळांचं स्थान मोठं आहे. त्यामुळे त्यांच्या हालचालींकडे नेहमीच लक्ष असतं. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. शिवसेनेला अंगावर घ्यायचं मात्र त्यांनी टाळलं. त्यातच आता त्यांनी आणखी एक खेळ केलाय... खराखुरा चित्रपटाचा खेळ...

नाशिकच्या एका चित्रपटगृहात 'ठाकरे'चा खेळ रंगला... पण याचं आयोजन शिवसेनेनं नव्हे, तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं होतं. यात जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ राजकीय नेते आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना या खेळासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. यात सर्व पक्षांचे नेते येतील, याची काळजीही भुजबळांनी घेतली... हा खेळ संपल्यावर त्यांनी अमित शाह यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं....

फोटो - http://v.duta.us/LwsV9wAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/DHVxNAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬