[maharashtra] - 'मोरया गोसावी'चं दर्शन घेऊन पार्थ पवारांची प्रचाराचा नारळ फोडला?

  |   Maharashtranews

मावळ, पुणे : मावळमधून राष्ट्रवादीकडून कोण उभे राहणार हे जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीचा धडाका लावला आहे. काल विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर आज पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवडकारांचं श्रद्धास्थान असलेल्या मोरया गोसावी गणपतीचा अभिषेक आणि आरती केली. उमेदवारीबाबत बोलणं त्यांनी टाळलं असलं तरी 'पक्षाचं काम करतोय' असं त्यांनी सांगत आपली उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचंच एकप्रकारे स्पष्ट केलं.

मोरया गोसावी गणपतीचे दर्शन घेऊन पार्थ पवारांनी मावळ प्रचाराचा नारळ तर फोडला नाही ना? अशी चर्चा आता मावळमध्ये सुरू झाली आहे.

गेल्याच महिन्यात, मावळ मतदार संघात आपण पराभूत होत आलोय, त्यामुळे दादा आता पार्थला उठ म्हणा, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं होतं. मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती....

फोटो - http://v.duta.us/btHbNgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/OBN-rAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬