[mumbai] - वाइनची ऑर्डर, प्राध्यापकाला २४ हजारांचा चुना

  |   Mumbainews

मुंबई मिरर

मुंबईतल्या माटुंगा येथील एका नामवंत महाविद्यालयातील ३८ वर्षाच्या प्राध्यापकाला वाइनची ऑर्डर देणं महागात पडलं. फोनवरून केलेल्या ऑर्डरमुळे त्याला तब्बल २४ हजारांचा चुना लावण्यात आला. या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्राध्यापकाने आपल्या शिपायाला फोनवरून वाइनची ऑर्डर करण्यास सांगितलं. शिपायाने गुगलवरून सर्च केलं आणि जवळच्याच वाइन शॉपचा फोन नंबर मिळवला. यानंतर शिपायाने वाइनची ऑर्डर देताना प्राध्यापकाच्या कार्डसंबंधीची सर्व माहिती दिली. तसंच वन-टाइम पासवर्ड(OTP) ही दिला. यामुळे काही मिनिटांत प्राध्यापकाच्या खात्यातून २४ हजार रुपये वळते करण्यात आले.

माटुंग्यातील रामनारायण रुइया महाविद्यालयात प्राध्यापक प्रशांत मसाळी हे जीवरसायन शास्त्र शिकवतात. ते बोरीवलीतील एमएचबी कॉलनीत राहतात. कामात व्यग्र असल्याने मसली यांनी शिपाई रूशाल राडे याला दारूच्या बाटलीची ऑर्डर करण्यास सांगितलं. यासाठी मसली यांनी शिपाई राडेकडे आपले क्रेडीट कार्ड आणि मोबाइल फोनही दिला. गुगलवरून शिपायाने बाबा वाइन शॉपचा फोन नंबर मिळवला आणि त्यावर फोन केला. वाइन शॉपच्या मालकाने फोन उचलल्यावर शिपाई राडे याने दारूच्या बाटलीची ऑर्डर केली. यावेळी दुकानदाराने ४२० रुपये देण्यास सांगितले. ऑनलाइन पे करणार असल्याचं सांगितल्यावर कार्डची सर्व माहिती शिपायाने दिली. तसंच OTPही दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली....

फोटो - http://v.duta.us/MeicDgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/KY10dAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬