[mumbai] - amol palekar: कणाहीनतेपेक्षा औचित्यभंगाचा ठपका घेऊन जगेन: पालेकर

  |   Mumbainews

मुंबई

'कणाहीन जगण्यापेक्षा तथाकथित औचित्यभंगाचा ठपका ठेऊन जगणे मी उचित मानतो', अशा शब्दांत प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी एनजीएमए संबंधित प्रश्नांबाबत बोलणे हा औचित्यभंग असल्याची टीका बहुलकर यांनी केली होती. त्यांनी नोंदवलेल्या आक्षेपांना पालेकर यांनी निवेदनाद्वारे उत्तर दिले आहे. मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये (एनजीएमए) दिवंगत चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचे भाषण रोखण्याच्या प्रकार घडला. त्यानंतर बहुलकर यांनी पालेकर यांच्यावर औचित्यभंगाचा आरोप केला होता.

लग्नाला जाऊन मर्तकाविषयी तर मी बोलत नव्हतो ना, असे सांगत ह्या लग्नात मुलीची फसवणूक होते आहे, हे जर कुणी दाखवून देत असेल तर तो औचित्यभंग ठरत नाही, एका सुसंस्कृत, सजग नागरिकांनी किंवा हितचिंतकांनी त्या मुलीची राखलेली ती बूज ठरते, ती त्याची जबाबदारी असते, अशा स्पष्ट शब्दांत पालेकर यांनी आपली बाजू मांडली आहे....

फोटो - http://v.duta.us/aXmyRwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/3VTMaAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬