[nagpur] - एसबीआयला आली जाग

  |   Nagpurnews

आर्थिक फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

गेल्या वर्षभरात ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. एटीएम कार्डचे क्लोनिंग, खातेधारकाला कॉल करून कार्डची माहिती घेऊन पैसे लांबविण्यासारखी फसवणूक सातत्याने वाढत आहे. यामध्ये सर्वाधिक तक्रारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) खातेधारकांच्या आढळल्या आहेत. त्यामुळे बँकेने या प्रकारच्या फसवणुकींपासून सावध राहण्याचे ग्राहकांना आवाहन केले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, मॅग्नेटिक स्ट्रिप असलेले सर्व कार्ड्स आता ब्लॉक केले जात आहे. जुन्या कार्डची जागा ईएमव्ही (युरोपे, मास्टरकार्ड आणि व्हिजा) चिप असलेल्या नव्या कार्डने घेतली आहे. नवीन चिप असलेले कार्ड स्कॅन करण्यासाठी ते पूर्णत: आत घालण्याची गरज नाही. चिप स्कॅन करून आर्थिक व्यवहार करण्यात येतात. खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी वापरण्यात येणाऱ्या पीओसी मशिनमध्येही नवीन कार्ड स्वाइप करण्यात येत नाही. तर चिप असलेला भाग स्कॅन करण्यात येतो. ईएमव्ही चिप असलेले कार्ड जास्तीत जास्त सुरक्षित मानले जाते. जुन्या मॅग्नेटिक स्ट्रिप कार्डमध्ये चोरट्यांना बनावट मॅग्नेटिक स्ट्रिप तयार करता यायची. त्याला क्लोनिंग म्हणतात. याउलट ईएमव्ही कार्ड्सची बनावट प्रत तयार करता येत नाही. स्कीमिंग पद्धतीने डाटा चोरणाऱ्यांनाही यामुळे आळा बसतो. समजा, तुमचे कार्ड हरवले तरी त्याचा वापर इतर कोणालाही करता येत नाही. जर तुम्हाला ईएमव्ही तंत्रज्ञान असलेले कार्ड ओळखायचे असेल तर ते फार सोपे आहे. या प्रकारच्या कार्डच्या डाव्या बाजूस सोनेरी रंगातील चिप दिसून येते. एसबीआयने सुद्धा नवीन कार्ड देण्यास सुरुवात केली आहे. याबाबत सुद्ध बँकेने ग्राहकांना आवाहन केले आहे. पण, अद्याप एटीएम कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीचे प्रमाण कमी झालेले नाही. विशेषत: यामध्ये एसबीआयच्या खातेधारकांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर एसबीआयने ग्राहकांना अधिकृतपणे न आलेल्या कॉल आणि मॅसेजवर कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देण्यात येऊ नये, असे सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे मॅसेजही बरेच फिरत आहेत. या प्रकारचे मॅसेज बँकेद्वारे पाठविण्यात आलेले नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/AI8sowAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬