[nagpur] - प्रेमाच्या गुलाबाला महागाईचे काटे

  |   Nagpurnews

किंमत वाढली; डच, बटर, चायनाला पसंती

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

कवींच्या कल्पनेत, ताजमहालच्या भिंतींवर, जुन्या काळातील राजा-महाराजांच्या हातात, दोन निस्सीम प्रेम करणाऱ्यांच्या हृदयात हमखास आढळते ते गुलाब. जुन्या काळापासून अगदी आत्ताच्या तरुणाईच्या आजी-आजोबांच्या काळापासून प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबाला पसंती मिळाली आहे. ताजे, टवटवीत, हलकेसे पाणी शिंपडलेले गुलाब हाती घेतल्यावर मन प्रफुल्लित झाल्याशिवाय आणि मनातील शब्द ओठांवर आल्याशिवाय राहात नाहीत. पण, प्रेमाच्या गुलाबाला सध्या महागाईचे काटे लागलेले आहेत.

प्रेम व्यक्त करण्याचे सर्वोत्तम माध्यम गुलाबाचे फूल मानले जाते. अनेक शब्दांतून जे व्यक्त होऊ शकणार नाही, ते गुलाबाचे एक सुंदर फूल सांगून जाते. यामुळेच की काय, व्हॅलेंटाइनच्या दिवशी बहुतांश प्रेमी त्यांचे प्रेम गुलाबाचे फूल देऊन व्यक्त करीत असतात. गुलाब आणि 'व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेशन'चे अतूट नाते आहे. प्रेमवीरांमध्ये गुलाबाची देवाण-घेवाण फारच लोकप्रिय आहे. लाल रंगाच्या गुलाबाला 'व्हॅलेंटाइन डे'ला अधिक मागणी असते. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक मानला जातो तर पांढरा गुलाब शांती व पिवळा गुलाब मित्रत्वाचे प्रतीक मानले जाते. गुलाबाच्या अप्रतिम सौंदर्याने आणि थेट भावनेला हात घालण्याच्या क्षमतेमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून 'व्हॅलेंटाइन डे'ला गुलाबांची विशेष मागणी असते. फुलांची मागणी वाढल्याने आज त्याचे दर दहा ते वीस रुपयांनी वाढले आहेत. वीस नगाच्या डच गुलाबाचा दर १५० रुपयांपासून ते तीनशे रुपयांपर्यंत तर गुलाबगड्डीचा (बारा नग) दर पन्नास ते शंभर रुपये इतका होता. गुरुवारी 'व्हॅलेंटाइन डे' असल्यामुळे गुलाबांच्या फुलांना बाजारात चांगली मागणी आहे. डच गुलाबाला सर्वाधिक मागणी असून, लाल गुलाबाला साठ रुपयांपासून एकशे तीस रुपये तर पिवळ्या गुलाबाला पन्नास रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत किंमत आहे. साध्या गुलाबगड्डीचा (१० ते १२ फुले) दर पन्नास ते शंभर रुपये इतका आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/RMkKtQAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬