[nagpur] - हृदय पाहून डॉक्टरही थक्क

  |   Nagpurnews

नागपूर : मुंबईत गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार येथे झालेल्या बॉम्बस्फोटात शिक्षा भोगत असलेला कैदी मोहम्मद हनीफचा नागपुरातील कारागृहात मृत्यू झाला. त्याचे सोमवारी मेडिकलमध्ये इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, त्याचे हृदय पाहून शवविच्छेदन करणारे डॉक्टरही थक्क झाले. सामान्यांच्या तुलनेत या कैद्याच्या हृदयाचे वजन तिप्पट असल्याचे डॉक्टरांना लक्षात आले. तरीही, हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा अंदाज व्यक्त करत हिस्टोपॅथोलॉजीसह इतर अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळणार असल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. हनीफच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक सोमवारी दुपारी मेडिकलमध्ये पोहचले. त्यांच्या उपस्थितीत इन कॅमरा मृतदेहाचा पंचनामा झाला. या प्रक्रियेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी घेण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये प्रक्रिया सुरू केल्यावर मृतदेहाचे हृदय सामान्यांच्या तुलनेत आकाराने तिप्पट तर वजनाने सुमारे ७०० ग्राम असल्याचे आढळले. सामान्यांचे हृदय २०० ते २५० ग्राम वजनाचे असते. मात्र, हृदयाचे एवढे वजन पाहून डॉक्टरही थक्क झाले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/lShP1AAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬