[nagpur] - ६५ गावांमध्ये टँकर सुरु

  |   Nagpurnews

म.टा.वृत्तसेवा, बुलडाणा :

जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प झालेल्या पावसामुळे पाणी टंचाईचे चटके जाणवायला लागले आहे. हिवाळ्यात बदललेल्या वातावरणामुळे बोचऱ्या थंडीसोबत दुष्काळदाह वाढला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तब्बल २७८ गावांमध्ये पाणी समस्येने ग्रासले असून ३१५ उपाययोजना सुरु केल्या आहेत. जिल्ह्यातील ६५ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. बुलडाणा, देऊळगाव राजा, मोताळा, खामगाव आणि शेगाव तालुक्यांना पाणी टंचाईची सर्वाधिक झळ सोसावी लागत आहेत.

पाणी टंचाईसाठी जिल्हा प्रशासनाने ऑक्टोंबर २०१८ ते नोव्हेंबर २०१९ पर्यंत कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये जिल्ह्यातील १४०० गावांपैकी ११२३ गावांचा समावेश असून २१६७ उपाययोजना यात प्रस्तावित आहे. यासाठी ४४

कोटी ६४ लाख रुपयांचा अपेक्षीत खर्च आहे. ऐन हिवाळ्यात ग्रामीण भागात पाणी प्रश्न पेटला असून टँकर सुरु करण्याच्या मागणीसाठी मोर्चेसुध्दा निघत आहेत. जानेवारी अखेरीस जिल्ह्यातील २१७ गावांत पाणी समस्या उग्र झाली होती. ४४ गावांची तहान टँकरने भागवावी लागली. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात गावांनी अडीचशेचा आकडा आणि टँकरने अर्धशतक ओलांडले आहे. २१३ गावांसाठी २५० खाजगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहे. दुसरीकडे पाण्याचे सर्व स्त्रोत व...

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/RESmKAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬