[nashik] - गावशिवारात रणधुमाळी

  |   Nashiknews

जिल्ह्यातील ५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एप्रिल ते जून २०१९ या काळात मुदत संपणाऱ्या राज्यातील ५६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील ५१ ग्रामपचायंतीचा यामध्ये समावेश आहे.

निवडणुकीसाठी गुरूवारी (दि. १४) प्रभागनिहाय मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. अंतिम मतदार यादी २१ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार असून लोकसभा निवडणूकांपुर्वीच ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (दि.११) जाहीर केला.

इगतपुरी तालुक्यातील ३३, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील १० ग्रामपंचयातींसह नाशिक तालुक्यातील चार, येवला तालुक्यातील दोन, मालेगाव आणि पेठ तालुक्यातील प्रत्येकी एका तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये रिक्त सरपंच पदासाठी पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार गुरुवारी मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार असून त्यावर सोमवारपर्यत (दि. १८) हरकती नोंदविता येणार आहेत. दाखल हरकती व सुचना निकाली काढून २१ फेब्रुवारीला अंतीम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/UdpX_AAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬