[nashik] - जाचक अटींविरोधात ‘ईसा’चे आंदोलन

  |   Nashiknews

१ नोव्हेंबर २०१८ चा शासननिर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, २०१२ ते २०१९ या शैक्षणिक वर्षांपर्यंतचा आरटीईअंतर्गत देण्यात आलेल्या २५ टक्के प्रवेशांचा थकीत शुल्काचा परतावा द्यावा, तसेच राज्यातील सर्व इंग्रजी शाळांच्या सुरक्षेसाठी शाळा सुरक्षा कायदा करण्यात यावा, या मागण्यांसह राज्य सरकारकडून इंग्रजी शाळांवर लादण्यात येणाऱ्या जाचक अटींविरोधात इंडिपेन्डंट इंग्लिश स्कूल्स असोसिएशन (ईसा) संघटनेकडून २५ फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेच्या अंतर्गत असलेल्या राज्यातील ४ हजार ४०० इंग्रजी शाळा या आंदोलनात सहभागी होतील, अशी माहिती संघटनेच्या सोमवारी आयोजित बैठकीत देण्यात आली.

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशाबाबत सरकारी व्यवस्थेकडून जाचक अटी लादण्यात येत असून, त्याचा निषेध करण्यासाठी ईसा संघटनेकडून राज्यव्यापी इंग्रजी शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. याविषयी माहिती देताना प्रदेशाध्यक्ष दायमा म्हणाले, की राज्य सरकार आरटीई प्रवेशांचा फी परतावा करण्यात अपयशी ठरले आहेत. गेल्या चार, पाच वर्षांची थकीत शुल्काचा परतावा देण्यासाठी सरकारने १ नोव्हेंबर २०१८ रोजी शासन आदेशाद्वारे जाचक अटी लादल्या आहे. या अटींमुळे इंग्रजी शाळांवर एका प्रकारे इन्स्पेक्टर राज लादण्यात आले आहे. गेले सहा वर्षे प्रवेश देताना सर्व शाळा पात्र होत्या. परंतु, आता फी परतावा देताना त्यांची पात्रता तपासणी करणे म्हणजे इंग्रजी शाळावर अन्याय आहे. यावेळी प्रदेश सचिव भरत भांदरणे, डॉ. संजय रोडगे, जागृती धर्माधिकारी, डॉ. प्रिन्स शिंदे, विवेक पडाळे आदी उपस्थित होते....

फोटो - http://v.duta.us/ZSiv3QAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/9CKq0wAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬