[nashik] - थंडीचा अल्पदिलासा!

  |   Nashiknews

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात गेले दोन दिवस चार ते पाच अंश सेल्सिअसवर घुटमळणारे किमान तापमान सोमवारी एकदम पाच अंश सेल्सिअसने वाढून १० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. याचवेळी कमाल तापमानातही कमालीची वाढ झाल्याने नाशिककरांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

नाशिककर गेले दोन दिवस सलग हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा अनुभव घेत आहेत. नाशिकसह जिल्ह्याच्या अन्य भागात चार ते पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले, तर निफाडमध्ये तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शहरातील तपोवनासह निफाडमधील काही गावांमध्ये तर किमान तापमान शुन्यापर्यंत गेल्याने गोठविणाऱ्या थंडीचा अनुभव नागरिकांना आला. दिवसभर वाहणाऱ्या थंड हवेमुळे नागरिकांना आरोग्याच्या तक्रारीही भेडसावू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी जिल्ह्यात किमान तापमान १०.२, तर कमाल तापमान ३२.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. कमाल तापमानही चार ते पाच अंशांनी वाढून ३० अंश सेल्सिअसच्या पुढे सरकल्याने दिवसभर हवेतून गारवा गायब झाल्याचा अनुभव नाशिककरांनी घेतला. कमाल तापमान वाढल्याने हवेतील गारवाही कमी होण्यास मदत झाली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/jI8RZwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬