[nashik] - लघु उद्योजकांवर धोरणात द्यावा भर

  |   Nashiknews

उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींचा सूर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गत साडेचार वर्षांमध्ये उद्योग धोरणांमधून खूप काही केल्याचा दावा भाजप सरकार करीत असले तरी लघु उद्योजकांसाठी अनेक गोष्टी अद्याप करावयाच्या बाकी आहेत. नाशिकमध्ये दोन दशकांपासून एकही मोठा उद्योग येऊ शकलेला नाही, या वस्तुस्थितीचा विचार करून सरकारने उद्योगविषयक धोरणांमध्ये आवश्यक तो बदल करावा, असा सूर निमा भवन येथे आयोजित संवाद सत्रातून उमटला. भाजप राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्या उपस्थितीत सोमवारी संवादसत्र झाले.

यावेळी मंचावर निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उपाध्यक्ष शशिकांत जाधव, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, निमा धोरण व विकास समितीचे अध्यक्ष व भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार उपस्थित होते. शशिकांत जाधव यांनी सांगितले, की उद्योगास अनुकूल असतानाही दोन दशकात नाशिकमध्ये कुठलीही गुंतवणूक येऊ शकलेली नाही. सरकारने औद्योगिक हितासाठी भूखंडवाटपविषयक धोरणे आणि कामगार कायद्यातही आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. सातत्याने होणारे बंद आणि आंदोलनांमुळे उद्योग क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होत आहे. रास्त मुद्द्यांसाठी हे योग्य असले तरी याचा हेतूपुरस्सर होणारा अतिरेक योग्य नाही. कामगार कायद्याने याचाही विचार करावा, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली....

फोटो - http://v.duta.us/gqzBDQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/duIWxwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬