[nashik] - वीजबिलांची आज होळी

  |   Nashiknews

वीजदरवाढ विरोधात उद्योग संघटना सरसावल्या

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महावितरण कंपनीने केलेल्या अवास्तव वीज दरवाढी विरोधात उद्योग क्षेत्रातील विविध संघटना सरसावल्या आहेत. महाराष्ट्र चेंबरच्या नेतृत्वाखाली निमा,आयमा, लघु उद्योग भारती, वीज ग्राहक संघटना, वीज ग्राहक समिती व व्यापारी संघटना आदी संघटनांच्या वतीने वीजबिलांची होळी आंदोलन आज (दि.११) सकाळी १०. ३० वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे करण्यात येणार आहे. यानंतर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना निवेदन देण्यात येणार आहे.

सप्टेंबर २०१८ पासून झालेली सर्व औद्योगिक वीज दरवाढ संपूर्णपणे रद्द करण्यात यावी, राज्यातील औद्योगिक वीज दर नोव्हेंबर २०१६च्या आदेशानुसार मार्च २०२० पर्यंत कायम ठेवण्यात यावेत, राज्य सरकारने सप्टेंबर २०१८ते मार्च २०२० पर्यंतच्या दर फरकापोटी ३४०० कोटी रुपये अनुदान महावितरण कंपनीस द्यावे, या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून हे आंदोलन आज होणार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/1cAWMQAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬