[navi-mumbai] - दिघावासीय आक्रमकदिघावांसीयांचा मंत्रालयावर लॉगमार्च काढण्याचा निर्धारनवी मुंबई ता

  |   Navi-Mumbainews

मंत्रालयावर लाँगमार्च काढण्याचा निर्धार

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

दिघा परिसरातील घरांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येईल, असे आश्वासन सरकारने दिघावासीयांना आझाद मैदानात केलेल्या उपोषणादरम्यान दिले होते. मात्र दिघ्या मधील घरांबाबत सरकारने काहीच हालचाली सुरू न केल्यामुळे दिघा घर बचाव संघर्ष समितीने मंत्रालयावर लाँगमार्च काढण्याचा निर्धार केला आहे. मंत्रालयावर लाँगमार्च काढताना रोखल्यास दिघा ते पंढरपूरपर्यत पायी यात्रा काढून विठ्ठलाच्या मंदिरातच ठाण मांडण्याचा इशारा धार्मिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भरत पाटणकर यांनी दिला. दिघा घर बचाव समितीच्या वतीने रविवारी दिघा येथील हिंदमाता विद्यालयाच्या प्रांगणात निवारा हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

उच्च न्यायलयाच्या आदेशानुसार दिघा येथील ९९ अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अद्याप तीन निवासी इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या असून नऊ इमारतींना कुलूप टोकण्यात आले आहे. त्यामुळे शेकडो कुटुंब बेघर झाली आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार दिघावासीयांवर कारवाईची टांगती तलवार असल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेत सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे....

फोटो - http://v.duta.us/hBggsgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ytMrnQAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬