[navi-mumbai] - पालिका कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा

  |   Navi-Mumbainews

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यां अनेक समस्यांना आजही सामोरे जावे लागत आहे. वर्षानुवर्षे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या नियमनारूप समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. मात्र त्याकडे पालिकेतील वरिष्ठ स्तरावरील अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत येत्या १४ दिवसांत समस्या सोडवल्या नाही, तर २६ फेब्रुवारी रोजी पालिका आयुक्तांच्या दालनासमोर, तर २७ फेब्रुवारीपासून पालिका मुख्यालयाच्या आवारात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी-अधिकारी संघटनेने पालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

पालिकेतील सर्व संवर्गाची सेवाजेष्ठता यादी पालिका अधिनियमानुसार प्रसिद्ध करावी, शैक्षणिक अर्हतेची नोंद सेवापुस्तकात घ्यावी, आकृतीबंधातील आराखड्याप्रमाणे रिक्त पदांवर नियमानुसार पात्र कर्मचाऱ्यांना तत्काळ पदोन्नती देण्यात यावी, महासभा मंजूर ठरावाप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी गृहकर्ज प्रस्तावास तत्काळ मंजुरी द्यावी, आकृतीबंधानुसार कर्मचाऱ्यांना आस्थापित करावे, पदोन्नती दिलेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ फरकासह द्यावे, सरकारने मंजूर केलेल्या आकृतीबंधातील नियम २ (४) च्या अटी व शर्तीचे पालन करून कर्मचाऱ्यांच्या नेमणुका आणि बदल्यावर तत्काळ निर्णय घ्यावा, प्रशासन विभागातील किमान चार वर्षांपेक्षा जास्त कालावधीत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करावी, सहा महिन्यांहून अधिक काळ निलंबित कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी शिस्त व पालन प्रमुख म्हणून सेवेत घ्यावे, निवृत्त होणाऱ्या पालिकेतील विविध आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक सेवापूर्ती निरोप द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्यांकडे पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी गांभीर्याने विचार करीत १४ दिवसांत निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा अध्यक्ष विजय पाटील यांनी दिला आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/uaAsnAAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬