[navi-mumbai] - भरती प्रक्रियेवर आक्षेप

  |   Navi-Mumbainews

आश्रमशाळा, वसतिगृहातील कर्मचाऱ्यांचा सोग्रसजवळ मोर्चा

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

आदिवासी विभागाकडून राबविली जात असलेल्या भरती प्रक्रियेतील जाचक अटी व शर्तींमुळे आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहामधील पूर्वाश्रमीचे रोजंदारी कर्मचारी डावलले जात आहेत. त्यामुळे वर्ग ३, वर्ग ४ कर्मचाऱ्यांना भरती प्रकियेत १०० टक्के सामावून घेण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी काढण्यात आलेला लाँग मार्चने सोमवारी सोग्रस फाट्याजवळ तंबू ठोकला आहे. आदिवासी विभागाकडून सकारात्मक निर्णय न आल्याच उद्या मंगळवारी आदिवासी आयुक्तालयात सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग ३, वर्ग ४ कर्मचारी संघर्ष संघटनेच्या वतीने सोमवारी सोग्रस (ता. चांदवड) येथून काढण्यात आलेल्या 'लाँग मार्च' सुरू होण्याआधीच पोलिस प्रशासनाने आंदोलकांना मालेगाव, देवळा, भावडबारी येथील टोल नाक्यावर स्थानबद्ध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आंदोलकर्त्यांचा उद्रेक झाला. यातूनही मार्ग काढत संघटनेचे अध्यक्ष रितेश ठाकूर यांच्यासह काही आंदोलक सोग्रस येथे पोहचल्यानंतर तेथे आंदोलन झाले. जोपर्यंत अटक व स्थानबद्ध केलेल्या सहकाऱ्यांना सोडत नाही तोपर्यंत पोलिस प्रशासनाशी चर्चा नाहीच असा निर्धार आंदोलकांनी केल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलेले संघटनेचे सचिव कमलाकर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना तत्काळ सोग्रस येथे पाचारण केले. अप्पर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना आंदोलकांनी 'तुम्ही आम्हाला नोकरी देऊ शकत नाही तर आम्हाला थांबविता का' असा सवाल केला. नीलोत्पल यांनी चर्चा करूनही आंदोलक 'लॉग मार्च'च्या निर्धारावर ठाम होते....

फोटो - http://v.duta.us/aR_cwwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/vQaPowAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬