[navi-mumbai] - शिक्षक भरती

  |   Navi-Mumbainews

शिक्षक भरतीबाबत संभ्रम कायम

नियम तयार नसल्याने शिक्षण विभागही पेचात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकार सरकारी आणि अनुदानित शाळांमधील साधारण १२४४१ जागांवर शिक्षक भरती करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र इयत्ता सहावी ते आठवी वर्गासाठी शिक्षक भरती करण्याचे नियमच तयार नसल्याने या वर्गातील साधारण ३,९४२ जागा रिक्त जागा भरायच्या कशा, असा प्रश्न शिक्षण विभागासमोर निर्माण झाला आहे. सरकारने या वर्गासाठी खास टीईटी -२ परीक्षा घेतली होती. मात्र, आता हे उमेदवार शिक्षक भरतीच्या प्रक्रियेपासून वंचित राहतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यात २४ हजार जागांसाठी तातडीने शिक्षक भरती सुरू व्हावी आणि लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी प्रत्यक्ष नियुक्ती पत्र द्यावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील भावी शिक्षकांनी सुरू केलेल्या उपोषणाला आठ दिवस पूर्ण झाले आहे. शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध होत नसल्याने उदविग्न झालेल्या उमेदवारांच्या शिष्टमंडळाने सोमवारी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची भेट घेतली. या भेटीत सोळंकी यांनी उमेदवारांना शिक्षण भरतीच्या सध्याच्या प्रक्रियेची माहिती दिली. शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीबाबत सर्वोतोपरी निर्णय़ तत्काळ घेण्यात येत असून, बिंदूनामावलीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण होण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि मागास वर्गीय कक्षासोबत ताळमेळ साधला जात असल्याची माहिती सोळंकी यांनी दिल्याचे उमेदवारांनी सांगितले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/otlrFAAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬