[pune] - काकडे, पवार भेटीने शहरात चर्चांना उधाण

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'काही सोंगाड्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात मतभेद झाले असले, तरी आमची मैत्री कायम आहे. शहर आणि राज्य पातळीवर भाजपने आपला वापर करून घेतल्याने मदतीसाठी अजित पवार यांची भेट घेतली,' असे खासदार संजय काकडे यांनी सोमवारी सांगितले. एका भावाने लाथ मारल्यास दुसरे घर शोधावेच लागते, असे सूतोवाच करून काकडे यांनी लोकसभा लढण्याचे संकेत दिले. निवडणूक राष्ट्रीय पक्षाकडूनच लढविणार असून, भाजप आपल्याला तिकीट देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पवार सोमवारी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कार्यालयात आले असता काकडेंनी त्यांची भेट घेतली. बंद दरवाजाआड चर्चा झाल्यानंतर दोघांनीही चर्चेची माहिती दिली. 'काकडे भाजपचे नसून, ते सहयोगी सदस्य आहेत. राजकारणात ते फारच मुरले आहेत. त्यांना लोकसभेला संधी मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, कार्यकर्ते काय भूमिका घेतील, हे समजून घेण्यासाठी ते आले होते,' असे पवार म्हणाले. काकडे यांनीही पवार यांचे कौतुक करताना दोघांची मैत्री १९९७पासून असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यातील मोठा पक्ष असून, पालिका निवडणुकीत पक्षाला पुणे लोकसभा मतदारसंघात साडेतीन ते चार लाख मते मिळाली आहेत. आगामी काळात निवडणूक लढविताना राष्ट्रवादी काँग्रेसची आवश्यकता आहे. मी साधा बांधकाम व्यावसायिक आणि ते आमदार होते. तेव्हापासून आमची मैत्री आहे, असे काकडे म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी जो उमेदवार देतील, त्याचे काम 'राष्ट्रवादी'चे कार्यकर्ते करतील, असेही पवार म्हणाले....

फोटो - http://v.duta.us/IgIWrAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/OfbkPwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬