[pune] - कडाक्याच्या थंडीनंतर पुन्हा तापमानात वाढ

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी,

दोन-तीन दिवस सलग कडाक्याच्या थंडीचा अनुभवल्यानंतर शहरातील तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्याने हवामान अंशत: ढगाळ झाले आहे. परिणामी, शहरातील कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअसपर्यंत, तर किमान तापमान १०.६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. पुढील दोन दिवस हवामान अंशत: ढगाळ राहून किमान तापमानात लक्षणीय होण्याची शक्यता आहे.

मागील दोन ते तीन दिवस पुण्यातील किमान तापमान पाच ते सात अंशांदरम्यान राहिल्याने पुणेकरांना हुडहुडी भरली होती. उत्तरेकडील राज्यातून महाराष्ट्राकडे वाहणारे थंड आणि कोरडे वारे प्रवाही असल्याने पुण्यासह राज्यभर थंडीचा कडाका होता. मात्र, वातावरणात झालेले बदल आणि हवेची चक्राकार स्थिती यामुळे उत्तरेकडून राज्याकडे वाहणारा थंड व कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह खंडित झाल्याने तापमानात पुन्हा वाढ होत आहे. सोमवारी पुण्यासह राज्यातही बहुसंख्य ठिकाणी तापमानात वाढ झाली. अरबी समुद्राचा पूर्वमध्य भाग आणि लगतच्या कोकणपट्ट्यात हवेची चक्राकार स्थिती आहे. त्यामुळे बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात विदर्भ परिसरात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात हवामान अंशत: ढगाळ राहील. तर पुण्यात दुपारी किंवा सायंकाळी हवामान अंशत: ढगाळ राहून किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

फोटो - http://v.duta.us/saCW7wAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/uBzbzQAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬