[pune] - पुणेः मारवा संगीत महोत्सवाचे आयोजन

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मारवा कला फाउंडेशनतर्फे १७ फेब्रुवारी रोजी 'मारवा संगीत' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात प्रसिद्ध सतार वादक रईस बाले खान यांना 'संगीत महर्षी डॉ. अण्णासाहेब गुंजकर पुरस्कार' प्रदान केला जाणार आहे,' अशी माहिती संस्थेचे प्रमोद गणोरकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. वृषाली उरेकर आणि गौरी भडसावळे उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजता शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारक येथे होणाऱ्या कार्यक्रमात पं. शौनक अभिषेकी यांचे गायन आणि रईस बाले खान यांचे सतारवादन होणार आहे. रईस बाले खान हे किराणा आणि धारवाड घराण्याचे प्रतिनिधित्व करतात.

मूळचे यवतमाळ येथील संगीतमहर्षी डॉ. अण्णासाहेब गुंजकर यांचे शास्त्रीय गायनाबरोबरच सतार, सारंगी, दिलरूबा, हार्मोनियम अशा एकूण १६ वाद्यांवर प्रभुत्व होते. कठोर आणि खडतर साधना करून त्यांनी संगीत अलंकार आणि संगीत प्रवीण (पी.एचडी) अशा पदव्या प्राप्त केल्या. कार्यक्रमाला शास्त्रीय गायक पं. नाथराव नेरळकर, मोहनकुमार दरेकर, राम नायर, नितीन कुळकर्णी उपस्थित राहणार आहेत.

फोटो - http://v.duta.us/vVYVkgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ZuX6MgAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬