[pune] - मेट्रोविरोधात नगरसेवक आक्रमक

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने नागरिकांकडून सहकार्याची भूमिका घेतली जात असताना, 'महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन'कडून (महामेट्रो) मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याची टीका करून कोथरूडमधील नगरसेवकांनी सोमवारी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत बदल करताना लोकप्रतिनिधींना पूर्वकल्पना दिली जात नसल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याची नाराजी या वेळी व्यक्त करण्यात आली.

वनाझ ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम आता कर्वे रस्त्यावर झपाट्याने पुढे सरकत आहे. अभिनव चौकातील (नळस्टॉप) प्रस्तावित दुहेरी उड्डाणपुलासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मात्र, तरीही महामेट्रोच्या कार्यपद्धतीबाबत लोकप्रतिनिधी समाधानी नसल्याचे चित्र सोमवारच्या बैठकीत दिसून आले. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता 'महामेट्रो'ने परस्पर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी अपेक्षा या वेळी सर्वांनी व्यक्त केली. शहराच्या भविष्याच्या दृष्टीने मेट्रो हवीच आहे; पण कामाच्या दरम्यान नागरिकांची गैरसोय होणार नाही, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना 'महामेट्रो'ला करण्यात आल्या....

फोटो - http://v.duta.us/bPrTHQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/aWtGTAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬