[pune] - ‘मटा मैफल’साठी नावनोंदणी सुरू

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'मैफल' या साहित्योत्सवांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यशाळांसाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. इच्छुकांना १९ फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. गझल लेखन, कथा लेखन, व्हिडिओ ब्लॉगिंग आणि सोशल मीडियावरील लेखन या विषयांवरील कार्यशाळेत त्या-त्या क्षेत्रातील नामवंत जाणकार मार्गदर्शन करणार आहेत. यांपैकी एक, दोन, तीन किंवा चारही कार्यशाळांत इच्छुकांना सहभागी होता येईल. त्यासाठी नावनोंदणी करणे गरजेचे आहे. गोखले इन्स्टिट्यूटच्या अॅम्फी थिएटरमध्ये या कार्यशाळा होतील.

गझल म्हणजे काय, गझल कशी लिहिली जाते, गझल लिहिताना कोणती काळजी घ्यावी, कोणती पथ्ये पाळावीत इथपासून अगदी गझलेल्या बाराखडीपर्यंतच्या गोष्टी 'गझल लेखन' कार्यशाळेत घेतल्या जाणार आहेत. प्रसिद्ध गझलकार संगीता जोशी ही कार्यशाळा घेणार आहेत. शैली, व्याकरण आणि विषयांसाठी गझलेच्या क्षेत्रात जोशी यांचे नाव नावाजले गेले आहे. नवोदित गझलकारांना त्या नेहमी मार्गदर्शन करत असतात. त्यांची पुस्तकेही प्रकाशित आहेत....

फोटो - http://v.duta.us/eTTCawAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/eA_xcwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬