[pune] - माहिती अधिकार कार्यकर्त्याचा मृतदेह आढळला

  |   Punenews

पुणे

माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येचं प्रकरण गाजलेल्या पुण्यात आता विनायक शिरसाट या माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या झाल्याचा संशय आहे. विनायक शिरसाट यांचा मृतदेह दरीत संशयास्पदरित्या आढळून आला आहे. त्यांची हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. विनायक शिरसाट हे गेल्या आठ दिवसांपासून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता होते. विनायक शिरसाट हे शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते होते.

विनायक सुधाकर शिरसाट हे बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचे भाऊ किशोर शिरसाट यांनी पोलीस ठाण्यात केली होती. आठ दिवसांपूर्वी ही तक्रार करण्यात आली. या तक्रारीनंतर पोलीस विनायक शिरसाट यांचा तपास करत होते. त्यांच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन हे मुठा गावाच्या हद्दीत मिळून आले. त्यावरुन भारती विद्यापीठ पोलीस गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात त्यांचा शोध घेत होते. मुळशी तालुक्यातील पिरंगुट ते लवासा दरम्यान असलेल्या दरीत विनायक शिरसाट यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मोबाइल आणि कपड्यांवरून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली. पोलिसांनी त्यांचा मृतदेह दरीतून वर काढला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अपहरण करुन मग त्यांची हत्या केल्याचा संशय आहे.

फोटो - http://v.duta.us/L2BPewAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/MxHJLgAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬